लंडन : जगातील सर्वात तेज तर्रार धावपटू जमैका उसेन बोल्ट याची स्वाक्षरी असलेला त्याचा बूटाचा जोड तब्बल १८,१५२ डॉलर्सना विकला गेलाय. उल्लेखनीय म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं हा लिलाव पार पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'काटाविकी' या लिलाव करणाऱ्या संस्थेनं या बुटांची सुरवातीची किंमत ८ हजार डॉलर्स इतकी निश्चित केली होती.


बोल्टच्या या बुटांचं वैशिष्ट्यं...


बोल्टचा हा बुटांचा जोड उल्लेखनीय आहे... कारण, हाच बुटांचा जोड घालून त्यानं २०१५ मध्ये जागतिक चॅम्पियनशीप (बीजिंग) पायाखाली घातली होती. यावेळी त्याने १०० मीटर्सच्या शर्यतीत अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिनला मागे टाकले होते. पुढे याच स्पर्धेत त्याने २०० मीटर्स तसेच ४ बाय १०० रिलेचे सुवर्णही जिंकले होते.