धरमशाला : धरमशाला टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कॅप्टन विराट कोहली अखेरच्या टेस्टला मुकण्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीला बॅकअप म्हणून मुंबईकर श्रेयस अय्यरला टीम इंडियात पाचारण करण्यात आलंय. रांची टेस्टमध्ये कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. खांद्याच्या दुखापतीतून विराट शंभर टक्के सावरलेला नाही. 


टीम प्रॅक्टिस दरम्यान त्यानं बॅटिंग प्रॅक्टिस केली नाही. तर फिल्डिंग प्रॅक्टिस त्यानं काहीवेळ केली. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता वर्तवली जातेय.