मुंबई : पहिल्यांदाच तिने ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आणि तिने केवळ मनेच जिंकली नाहीत तर रुपेरी यश मिळवले. अखेरच्या सामन्यात भले तिला सुवर्णपदकाने जरी हुलकावणी दिली असली तरी समस्त भारतीयांसाठी तिचे रुपेरी यश हे २४ कॅरेट सोन्याहून कमी नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र हे यश काही तिला सहजासहजी मिळालेले नाहीये. ८व्या वर्षांपासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात कऱणाऱ्या सिंधूंचे रोजचे रुटीन हे खडतर असते. सिंधूचे रुटीन सकाळी साडेतीन वाजता सुरु होते. 


सकाळी ३.३० वाजता -  सिंधूचे वडील सकाळ साडेतीन वाजता उठतात. त्यानंतर ते सिंधूला उठवतात आणि १५ मिनिटांत ते अॅकॅडमीमध्ये पोहोचतात. गोपीचंद यांच्या अॅकॅडमीमध्ये ती तब्बल ४ तास सराव करते. 


सकाळी ७.१० वाजता -  कोच गोपीचंद मेंटल स्ट्रेंथची ट्रेनिंग देतात. त्यानंतर सिंधू अर्धा तास योगा करते. 


सकाळी ७.४० वाजता - ब्रेकफास्टसाठी ती वडिलांबरोबर घरी जाते. 


सकाळी ९ वाजता - पुन्हा ९ वाजता ट्रेनिंगसाठी अॅकॅडमीमध्ये येते. दुपारी १२ पर्यंत सराव करते. 


दुपारी १२ वाजता - जेवणासाठी घरी जाते. लंचनंतर ती टीव्ही पाहते.


संध्याकाळी ७.३० वाजता - अॅकॅडमीमध्ये सराव केल्यानंतर पुन्हा घरी येते. आई-वडिलांसोबत वेळ घालवते आणि टीव्ही पाहते. 


रात्री ९.३० वाजता - जेवण झाल्यानंतर सिंधू झोपायला जाते. 


सिंधूला जेवणामध्ये खिमा रोटी आणि बिर्याणी आवडते. टीव्हीवर तिला तेलुगु सिनेमे पाहायला आवडतात. तिचे फेव्हरेट स्टार्स प्रभास आणि महेश बाबू आहेत. सिंधूला टीव्ही पाहायला खूप आवडते. वेळ मिळाल्यास ती रात्रभरही टीव्ही पाहते.