मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्य पदक मिळवत भारताची शान उंचावली. मात्र एकीकडे ती देशासाठी पदक मिळवण्यासाठी झटत असताना दुसरीकडे भारतीय मात्र तिची जात कोणती हे शोधण्यात व्यस्त होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण स्वत:ला कितीही पुरोगामी म्हणत असलो तरी या प्रकाराने जातीचा पाश अद्याप उतरलेला नसल्याचेच दिसून येते. फायनलमध्ये सिंधू कॅरोलिना मरिनला हरवण्यासाठी झुंजत होती तर दुसरीकडे गुगल सर्चमध्ये सिंधूची जात सर्वाधिक सर्च केली जात होती. गुगल इंडियाने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘सर्च रिझल्ट’मध्ये ही माहिती समोर आलीये. 


सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला हरवत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर तिचे नाव मोठ्या प्रमाणात सर्च केले जात होते. तिच्याबदद्लची माहिती मिळवली जात होती. मात्र त्याचबरोबर तिची जात कोणती हेही पाहणाऱ्यांची संख्या मोठी होती.


या सर्चिंगमध्ये आंध्र प्रदेश पहिल्या स्थानी तर त्यापाठोपाठ तेलंगणा, हरियाणा, कर्नाटक आणि तामिळनाडूचा नंबर लागतो. सर्चमध्ये पीव्ही सिंधू टाकल्यास चौथ्या स्थानी pv sindhu catste दिसते.