नवी दिल्ली :  ऑस्ट्रेलिया खेळण्यात आलेल्या ऑस्ट्रेलिया डोमेस्टिक क्रिकेट टुर्नामेंटमध्ये एक असा विक्रम झाला जो आजपर्यंत आपण कधी ऐकला नसेल. असा विक्रम हा प्रत्येक गोलंदाजाचे स्वप्न असू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हांला असा एक क्रिकेटर बाबत सांगणार आहोत. ज्याने हा कारनामा केला आहे. या खेळाडूचे नाव आहे एलेड कॅरी... २९ वर्षांचा एलेड कॅरी याने एका ओव्हरमध्ये दोन हॅट्ट्रीक घेतल्या आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटर बनला आहे. 


 



कॅरीने हा विक्रम इस्ट बल्लारट विरूद्ध खेळताना केला आहे. कॅरीने एका ओव्हरमध्ये सहा विकेट आणि दोन हॅट्ट्रिक घेतल्या आहेत. त्याला आठ ओव्हरमध्ये एकही विकेट मिळाली नव्हती. पण ९ व्या ओव्हरमध्ये त्याने एक अनोखे रेकॉर्ड केले आहे. 


या कामगिरीबद्दल कॅरी म्हणाला, मी हा विक्रम बनवून खूप खुश आहे. एका ओव्हरमध्ये दोन हॅट्ट्रिक मिळविणे, माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा विक्रम मी माझ्या वडिलांसमोर केला आहे.