मुंबई : भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं त्याची सर्वोत्तम टीम म्हणजेच 'ऑल टाईम बेस्ट XI'ची घोषणा केली आहे. सौरव गांगुलीनं त्याच्या या टीममध्ये दोन भारतीयांची निवड केली आहे. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड हे दोन भारतीय दादाच्या टीममध्ये आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव गांगुलीच्या टीमचा कॅप्टन रिकी पॉईटिंग आहे, तर मॅथ्यू हेडन आणि अॅलिस्टेअर कूक हे दोघं गांगुलीच्या टीममध्ये ओपनर आहेत. माझ्या टीममध्ये ओपनिंगसाठी मी सेहवागला घेण्यासाठी उत्सुक होतो पण डावखुरे बॅट्समन ओपनर म्हणून घ्यायचा मी निर्णय घेतला असं गांगुली म्हणाला आहे. श्रीलंकेचा कुमार संगकारा गांगुलीच्या टीममध्ये विकेट कीपर आहे. 


अशी आहे सौरव गांगुलीची टीम 


मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया), अॅलिस्टेअर कूक (इंग्लंड), राहुल द्रविड (भारत), सचिन तेंडुलकर (भारत), जॅक कॅलिस (द.आफ्रिका), कुमार संगकारा (श्रीलंका), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया, कर्णधार), ग्लेन मॅग्रा (ऑस्ट्रेलिया), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)