नागपूर : आजपासून सुरु होत असलेल्या टी-२० वर्ल्डकप अभियानात न्यूझीलंडची पहिली लढत यजमान भारताशी होतेय. मात्र सामन्यापूर्वीच न्यूझीलंडचा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधार केन विल्यमसन्स घाबरलाय. भारताला त्यांच्या मातीत पराभूत करणे कठीण असल्याचे वक्तव्य त्याने पत्रकार परिषदेत केलं. 


न्यूझीलंडसाठी भारताची खेळपट्टी हे आजच्या सामन्यातील मोठे आव्हान आहे. मला आशा आहे की फिरकी गोलंदाज या स्पर्धेत महत्त्वाची भूमिका बजावतील. 


मुंबईतील सराव सामन्यात आमच्याकडे वेगवान गोलंदाज होते मात्र चेंडू कमी स्विंग झाला. मात्र नागपुरची खेळपट्टी पाहता येथे स्पिनर्सचा बोलबाला राहू 


शकतो. त्यानुसार आम्ही आमच्या रणनीतीत बदल करुन खेळण्यासाठी उतरु असे विल्यमसन्स म्हणाला. 


जेव्हा जेव्हा तुम्ही देशाबाहेर खेळायला जाता तेव्हा तुम्हाला तेथील परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. यूएई आणि मुंबईमध्ये आमची तयारी चांगली झालीये. मात्र भारतात तुम्ही जिथे खेळता तेथील परिस्थिती वेगवेगळी असते, असेही पुढे विल्यमसन्सने सांगितले.