जयपूर : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर 7 वर खेळत असताना अनेकदा दमदार कामगिरी केलीय. ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूनं धोनीनं 10 वर्षांपूर्वी केलेला एक रेकॉर्ड तोडलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी ऑस्ट्रेलियाचा युवा बॅटसमन मार्कस स्टोइनिस यानं ऑकलंडमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे मॅचमध्ये नाबाबद 146 रन्स केले. या मॅचमध्ये नंबर 7 वर बॅटिंगसाठी आलेल्या मार्कस स्टोइनिसनं महेंद्रसिंग धोनीच्या रेकॉर्डला मागे टाकलं. 


धोनीनं नंबर 7 वर बॅटिंग करत नाबाद 139 रन्सची खेळी केली होती. 2007 मध्ये एफ्रो-एशिया कपमध्ये धोनीनं ही कामगिरी केली होती... हाच रेकॉर्ड आता तुटलाय. 


या रेकॉर्डसहीत मार्कस नंबर 7 वर बॅटिंग करताना सर्वाधिक स्कोअर बनवणाऱ्या बॅटसमनच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आलाय. पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंड ल्यूक रॉकी आहे. रॉकीनं 2015 मध्ये श्रीलंकेच्या विरुद्ध सातव्या क्रमांकावर बॅटिंग करत नाबाद 170 रन्स केलेत.