`नेहरासाठी वय ही फक्त संख्या`
भारतीय संघामध्ये शानदार कमबॅक केल्यानंतर आशिष नेहरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवी दिल्ली: भारतीय संघामध्ये शानदार कमबॅक केल्यानंतर आशिष नेहरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताचे माजी कॅप्टन सुनिल गावसकर यांनी नेहरा चलाख बॉलर असल्याचं म्हंटलं आहे. तसंच वय ही नेहरासाठी फक्त एक संख्या असल्याचंही गावसकर म्हंटले आहेत.
2011 वर्ल्ड कपनंतर नेहरा टीमच्या बाहेर गेला. त्यानंतर तब्बल 5 वर्षानी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केला. बांग्लादेशविरुद्धच्या आशिया कपमधल्या पहिल्याच मॅचमध्ये नेहरानं 3 विकेट घेतल्या आणि भारताचा विजय निश्चित केला.
गावसकर यांनी भारताचा ओपनर रोहित शर्माचंही कौतूक केलं आहे. याच मॅचमध्ये रोहितनं 55 बॉलमध्ये 83 रन बनवल्या होत्या. रोहितचं शॉट सिलेक्शन चांगलं आहे. ज्या पिचवर इतर बॅट्समनना संघर्ष करावा लागत होता, तिथे रोहित अगदी सहज बॅटिंग करत होता, असं गावसकर म्हणाले.
याचवेळी गावसकर यांनी बांगलादेशच्या फिल्डिंगवर टीका केली आहे. रोहितचा कॅच सोडणं हा मॅचचा टर्निंग पॉईंट होता. रोहित सारख्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूचा कॅच तुम्ही सोडू शकत नाही. बांगलादेशला फिल्डिंगमध्ये खूप प्रॅक्टिस करावी लागणार असल्याची प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली आहे.