बंगळूरु : आयपीएलच्या दहाव्या हंगामातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नरिनेने धमाकेदार अर्धशतकी खेळी साकारली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याने अवघ्या १५ धावांत ५० धावा कुटल्या. १७ चेंडूंत ५४ धावा करत तो बाद झाला. पहिल्या सहा षटकांतच केकेआरने धावांचे शतक पूर्ण केले. 


बंगळुरुने विजयासाठी ठेवलेले १५९ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी केकेआरचे सलामीवीर ख्रिस लिन आणि सुनील नरिने मैदानात उतरले. पहिल्या षटकापासूनच या जोडीने बंगळूरुच्या गोलंदाजांना चांगलेच दणकावले. 


नरिनेने १७ चेंडूत ५४ धावा केल्या तर लिनने २२ चेंडूत ५० धावा तडकावल्या. या दोघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सहा षटकांतच केकेआरला १०० धावांचा टप्पा पार करता आला.