विशाखापट्टणम: सनरायजर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सचा 85 रन्सनं दारुण पराभव केला आहे. 178 रनचा पाठलाग करताना मुंबईचा फक्त 92 रनवर ऑल आऊट झाला आहे. हैदराबादकडून आशिष नेहरा आणि मुस्तफिजूर रेहमाननं प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. मुंबईकडून हरभजन सिंगनं सर्वाधिक नाबाद 21 रन बनवल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशाखापट्टणममध्ये झालेल्या या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण हैदराबादचे ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवननं 85 रनची पार्टनरशिप केली. डेव्हिड वॉर्नर 48 रनवर आऊट झाला. पण शिखर धवननं 57 बॉलमध्ये नाबाद 82 आणि युवराज सिंगनं 23 बॉलमध्ये 39 रन करून हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 177 रनपर्यंत पोहोचवलं. 


या विजयामुळे हैदराबाद पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे. 9 मॅचनंतर हैदराबादच्या खात्यात 12 पॉईंट्स आहेत. तर मुंबई 10 मॅचमध्ये 10 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.