मुंबई : सनरायजर्स हैदराबाद आयपीएल सिझन ९ ची चॅम्पियन झाली आहे. नेहमी प्रमाणे यंदाच्या वर्षीही अनेक खेळाडूंनी आपला प्रभाव पाडला. या वर्षी सर्वाधिक चर्चा झाली ती रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरचा कॅप्टन विराट कोहलीच्या अफलातून कामगिरीची. कोहलीनं या सिझनमध्ये तब्बल 973 रन केल्या, तर हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारनं सर्वाधिक 23 विकेट घेतल्या. पण या सिझनमध्ये अनेक खेळाडू सुपर फ्लॉप ठरले, त्यांच्या कामगिरीवर एक नजर टाकूया. 


हार्दिक पांड्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हार्दिक पांड्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हार्दिकनं 11 मॅचमध्ये फक्त 44 रन केल्या आणि 3 विकेट घेतल्या. यानंतर मात्र त्याला बाहेर बसवण्यात आलं. 


आर. अश्विन


टी 20 क्रिकेटमधला जगातल्या सर्वोत्तम स्पिनरमध्ये आर. अश्विनचा समावेश होतो, पण या आयपीएलमध्ये अश्विननं सगळ्यांनाच निराश केलं. पुण्याकडून खेळणाऱ्या अश्विननं 14 मॅचमध्ये फक्त 10 विकेट घेतल्या. 


पवन नेगी


आयपीएल सुरु होण्याआधी झालेल्या लिलावामध्ये पवन नेगी हा सर्वाधिक रक्कम मिळवणारा भारतीय खेळाडू ठरला होता. मैदानामध्ये मात्र नेगीला पैशांना साजेसा असा खेळ करता आला नाही. दिल्लीकडून खेळणाऱ्या नेगीनं या सिझनमध्ये 8 मॅचमध्ये 57 रन केल्या आणि फक्त एक विकेट घेतली. 


दीपक हुडा


भारताकडून खेळण्याचं सामर्थ्य असणारा खेळाडू म्हणून दीपक हुडा या युवा खेळाडूची चर्चा होते. दीपक हुडाला मात्र आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. सनरायजर्सच्या हैदराबादच्या हुडानं 17 मॅचमध्ये 144 रन केल्या आणि 3 विकेट घेतल्या. 


डेव्हिड मिलर


आयपीएलच्या या सिझनच्या सुरवातीला डेव्हिड मिलर किंग्ज इलेव्हनचा कॅप्टन होता. कॅप्टनशीप आणि बॅटिंग या दोन्हींमध्ये मिलरला फारशी चमक दाखवता आली नाही. मिलरनं 14 मॅचमध्ये 161 रन केल्या. मिलरच्या नेतृत्वामध्ये पंजाबनं पहिल्या 6 पैकी फक्त एकच मॅच जिंकली. यानंतर पंजाबनं मुरली विजयकडे कॅप्टनशीपची धुरा सोपवली. 


रविंद्र जडेजा


गुजरात लायन्सकडून खेळणाऱ्या जडेजाची कामगिरी निराशाजनक झाली. 15 मॅचमध्ये जडेजानं फक्त 191 रन केल्या आणि 8 विकेट घेतल्या. 


शाकिब अल हसन


कोलकता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या शाकिब अल हसननं 10 मॅचमध्ये 114 रन केल्या आणि फक्त 5 विकेट घेतल्या. 


श्रेयस अय्यर


रणजी ट्रॉफीमध्ये खोऱ्यानं रन काढलेल्या श्रेयस अय्यरकडून आयपीएलमध्येही चांगली कामगिरी करण्याच्या अपेक्षा वाढल्या होत्या, पण तशी कामगिरी त्याला करता आली नाही. दिल्लीकडून खेळताना अय्यरनं 6 मॅचमध्ये फक्त 30 रन केल्या. 


हरभजन सिंग


क्रिकेटचा सर्वाधिक अनुभव असणाऱ्या स्पिनरपैकी एक म्हणजे हरभजन सिंग. अनुभवाला साजेशी कामगिरी हरभजनला यंदा करता आली नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजनला 14 मॅचमध्ये 9 विकेट्स घेतल्या.