नवी दिल्ली : भारतात टी-२० वर्ल्डकपचे घमासान सुरु झालेय. ही सहावी वर्ल्डकप स्पर्धा आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित कऱण्यात आला आहे. यंदाच्या वर्ल्डकपसाठी भारताला विजयासाठी प्रमुख दावेदार मानलं जातय. गेल्या ११ टी-२० सामन्यात भारताने १० सामने जिंकलेत. तसेच आशियाकप जिंकल्याने भारताचे मनोबलही उंचावले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंतच्या पाच वर्ल्डकप स्पर्धांमध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका या संघानी विजेतेपद पटकावले मात्र एकाही संघाला दोन वेळा या स्पर्धेचे जेतेपद जिंकता आलेले नाही. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या वहिल्या टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा पराभव करताना जेतेपदावर नाव कोरले होते. त्यानंतर पाकिस्तानने वर्ल्डकप जिंकला. २०१० ने इंग्लडने हा किताब जिंकला. २०१२मध्ये श्रीलंकेला हरवत वेस्ट इंडिजने जेतेपद मिळवले. 


दोन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही जेतेपद मिळवू न शकलेल्या श्रीलंका संघाने अखेर २०१४मध्ये जेतेपदावर शिक्कामोर्तब केलेच.