लंडन: क्रिकेटच्या मैदानात रोजच वेगवेगळी रेकॉर्ड ब्रेक होत असतात, पण इंग्लंडमध्ये मात्र क्रिकेटमधल्या एका आगळ्यावेगळ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडमधील एक टीम एकही रन न काढता ऑलआऊट झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सिक्स ए साइड क्रिकेट स्पर्धेमध्ये हा पराक्रम झाला आहे. बापचाईल्ड विरुद्ध ख्राईस्ट चर्च युनिवर्सिटी या टीममध्ये झालेल्या मॅचवेळी पहिले बॅटिंग करताना ख्राईस्ट चर्चनं 120 रन केल्या.


 त्यानंतर बापचाईल्डची टीम 121 रनचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली, पण त्यांच्या एकाही बॅट्समनला भोपळाही फोडता आला नाही, आणि 20 बॉलमध्ये त्यांची टीम शून्य रनवर ऑलआऊट झाली.