विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 87/2 एवढा होता. शेवटच्या दिवशी भारताला आता आठ विकेट तर इंग्लंडला आणखी 318 रनची आवश्यकता आहे. पण विशाखापट्टणमची खेळपट्टी बघता भारताचा विजय निश्चित मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

98/3 अशी चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारतानं दुसऱ्या इनिंगमध्ये 204 रनची मजल मारत इंग्लंडला 405 रनचं आव्हान दिलं. पहिल्या इनिंगमध्ये 167 रनची खेळी करणारा विराट कोहलीनं या इनिंगमध्ये 81 रन तर जयंत यादवनं नाबाद 27 रन केल्या. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड आणि आदील रशीदनं प्रत्येकी चार विकेट तर अंडरसन आणि मोईन अलीनं प्रत्येकी एक विकेट घेतली.


405 रनचा पाठलाग करताना इंग्लंडचे ओपनर कूक आणि हमीदनं इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. पण अश्विननं हमीदला 25 रनवर तर जडेजानं कुकला 54 रनवर आऊट करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलं आहे.