रिओ : थायलंडच्या २० वर्षीय वेटलिफ्टरने ५६ किलो वजनी गटात ऑलंम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, अत्यानंद झाल्याने आजीने जल्लोष केला. या आनंदात आजीचा दुर्दैवी मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सिन्हपेट क्रूएथोंग याने ऑलंम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्याची बातमी समजताच त्याच्या बॅंकॉकमधळी गावात जल्लोष साजरा करण्यात येत होता. लोक आनंदाने मिरवणूक काढत होते आणि जल्लोष साजरा करण्यात दंग होते. यावेळी त्याची ८४ वर्षांची सुबिन आजीही सहभागी झाली होती. ती अचानक खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.


आनंदाचा महोल एकदम बदला. पोलिसांनी सांगितले की, अत्यानंदांना तिला हृदयविकाराचा झटका आला. ती आधी आजारी होती. मात्र, आपला नातू ऑलंम्पिकमध्ये सहभागी झाल्याने ती खूप खूश होती. 


सिन्हपेट  हा थायलंडमधील दुसरा खेळाडू आहे.  त्याने ऑलंम्पिकमध्ये पदक जिंकले आहे. या आधी शनिवारी ४८ वजनी गटात महिला वेटलिफ्टरने गोल्ड मेडल जिंकले आहे.