मुंबई: महिला पत्रकाराबरोर अश्लिल भाषेत बोलल्यामुळे क्रिस गेल चांगलाच वादात सापडला आहे. या वादावर अखेर गेलनं स्पष्टीकरण दिलं आहे. वर्णद्वेषामुळे हा वाद होत आहे, माझ्या जागी कोणी गोरा फूटबॉलपटू किंवा रगबी खेळाडू असता तर हा वाद झाला नसता असं गेल म्हणाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यश मिळवलेल्या कृष्णवर्णीयांना खाली खेचण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही गेलनं केला आहे. डेव्हिड बेकहॅम आणि लिओनार्डो डिकॅप्रियोवर एवढी टीका झाली असती का असा सवालही त्यानं विचारला आहे. 


या सगळ्या वादावर बोलताना गेलनं जमैकाचा ऍथलिट उसेन बोल्टचं उदाहरण दिलं आहे. उसेन बोल्टलाही एका महिला पत्रकारानं अशाच प्रकारे वादात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गेलनं केला आहे. 


काय होता नेमका वाद ?


ब्रिटीश वृत्तपत्र टाईम्सच्या महिला पत्रकार चारलोट एडवर्ड्सना सेक्सबद्दल गेलनं अश्लिल प्रश्न विचारले होते. माझ्याकडे जगातली सगळ्यात मोठी 'बॅट' आहे, तुला ती उचलायला दोन हात लागतील असं गेल म्हणाला होता. तसंच तु थ्रीसम सेक्स केला आहेस का, आत्तापर्यंत किती कृष्णवर्णीय पुरुषांबरोबर तु सेक्स केलास असे अश्लिल प्रश्न गेलनं या महिला पत्रकाराला विचारले.