दुसऱ्या टी-२०साठी संघात होऊ शकतात हे बदल
आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताला आज कोणत्याही स्थितीत सामना जिंकावाच लागेल.
नागपूर : आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताला आज कोणत्याही स्थितीत सामना जिंकावाच लागेल.
पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर दुसऱ्या सामन्यात संघात बदल केला जाऊ शकते. नागपूरमध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी भुवनेश्वर कुमारला संधी मिळू शकते.
पहिल्या टी-२०मध्ये बुमराह सपशेल अपयशी ठरला होता. त्याचे एक षटक संघाला चांगलेच महागात पडले होते. तसेच सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरत असलेल्या लोकेश राहुललाही या सामन्यात बाहेर बसवले जाऊ शकते.
पहिल्या सामन्यात भारताची फलंदाजी पुरती ढेपाळली होती. मधल्या फळीतील चार फलंदाजांनी मिळून केवळ २९ धावा केल्या होत्या. त्यामुळे फलंदाजी कोहली आणखी प्रयोग करणार का हे या सामन्यात पाहायला मिळेल.