कटक :  भारतीय क्रिकेट टीमला गेल्या दहा वर्षांत जर कोणते मैदान लकी आहे तर ते कटकचे बारबती स्टेडिअम असे म्हणता येईल. येत्या १९ जानेवारी रोजी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली इंग्लड विरूद्ध दुसरा एक दिवसीय सामना या ठिकाणीच होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने गेल्या दहा वर्षात बाराबती स्टेडिअमवर जे पाच सामने खेळले आहेत. त्यात सर्वांमध्ये विजय मिळविला आहे. यातील एक सामना भारताने २००८ मध्ये इंग्लंड विरूद्ध खेळला होता. त्यात भारताला सहा गडी राखून विजय मिळाला होता. 


भारताला २००३ मध्ये न्यूझीलंड विरूद्ध पराभव पत्करावा लागला होता. सध्याच्या संघातील केवळ युवराज सिंग या सामन्यात खेळला होता. यानंतर भारताने वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेला प्रत्येकी दोन वेळा आणि इंग्लडला एका सामन्यात पराभूत केले होते. ऑस्ट्रेलिया विरूद्ध झालेला एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. 


गेल्या दहा वर्षात भारताने सर्वाधिक १२ सामने आरपीएस कोलंबो आणि दाम्बुला येथे खेळले आहेत. त्यात कोलंबोत भारताने ९ सामने जिंकले तर ३ मध्ये पराभव पत्करावा लागला. तर दामबुलात सात मॅच जिंकल्या तर पाच गमावल्या आहेत. 


हरारे स्पोर्ट्स क्लबवर भारताने ११ पैकी नऊ सामने जिंकले तर दोनमध्ये पराभव पत्करावा लागला. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आठ पैकी सहा सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव झाला.