मुंबई : इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आठ तारखेपासून खेळवण्यात येणार आहे. या टेस्ट सीरिजमध्ये 2-0नं आघाडीवर घेतल्यानंतरही भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. या सीरिजमध्ये लोकेश राहुल, वृद्धीमान सहा आणि त्यानंतर हार्दिक पांड्या जखमी झाल्यानंतर आता मुरली विजय आणि मोहम्मद शमी यांच्या फिटनेसबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. ओपनर मुरली विजयला पाठीचं दुखणं सुरु झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुरली विजय सोडला तर भारतीय संघामध्ये एकही ओपनर सध्या नाही. यामुळे पार्थिव पटेलबरोबर चेतेश्वर पुजाराला ओपनिंगला पाठवण्याचा विचार कोहली करू शकतो. मोहम्मद शमी जर ही मॅच खेळला नाही तर त्याच्याऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी मिळू शकते.