नवी दिल्ली : मोहालीत रविवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जिंकल्यानंतर 'आज तक चॅनेल'वर लाईव्ह चॅट दरम्यान, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फास्ट बॉलर वसीम अक्रमला कथित रोखले गेले. याप्रकरणी न्यूज चॅनेलचे स्पोर्ट्स एडिटर विक्रांत गुप्ता यांनी ट्विट करुन संपूर्ण प्रकारावर पडदा टाकला.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाईव्ह शोदरम्यान, वसीम अकरम याला कोणीही विचारले नाही, एका दारुड्या व्यक्तिने लाईव्ह कॅमेऱ्यासमोर आपले लक्ष वेधन्यासाठी अशा प्रकारे हरकत केली. त्यावेळी वसीम अक्रम लाईव्ह बोलत होता. त्यावेळी काही लोकांनी त्याला रोखले. त्याचवेळी विक्रांत गुप्ता अॅंकरिंग करीत होते. काळजी करण्याचे कारण नाही, वसीम अक्रम ठिक आहे.


या घटनेच्यानंतर वसीम अक्रम हा गप्प होता. त्यानंतर त्यांने ट्विट केले, मुंबईत जी घटना घडली. त्याबद्दल आपण टार्गेट नव्हतो. हा प्रकार समजुतीने सोडविण्यात आलाय. आपण सर्वांनी जी चिंता व्यक्त केली, त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर वसीम अक्रमने आणखी एक टविट केले. पाकिस्तानमधील लाहोर दहशतवादी हल्ल्याबाबत निंदा करताना म्हटले, कृपया आपण सर्वांनी प्रार्थना करा, ज्यांना याची गरज आहे, निर्दोष लोकांना लाहोर हल्ल्यात मारले गेले आहेत.