नवी दिल्ली : टीम इंडियात स्थान न मिळवू शकलेले आणि दीर्घकाळ टीममधून बाहेर राहिलेले युवराज सिंग आणि हजभजन सिंग यांनी संघात पुनरागमन केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युवी आणि भज्जीला आशिया कप आणि T-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T-20 मालिकेसाठीच्या संघामध्ये युवीला स्थान देण्यात आले होते. मात्र, त्याला एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. आता आशिया कप आणि वर्ल्डकपसाठी त्याची निवड करण्यात आलेय.


ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीममधून युवराज आणि हरभजन सिंगला डच्चू देण्यात आला होता. हरभजनला या मालिकेत अंतिम संघात स्थान मिळाले नाही; तर युवराजसिंगला अखेरच्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली होती. 


आशिया कप आणि वर्ल्डकपचा संघ : 


महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, अजिंक्‍य रहाणे, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, आर. आश्‍विन, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, पवन नेगी, मोहमद शामी.