मुंबई : भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्जा आणि माजी माजी भारतीय क्रिकेटर संजय मांजरेकर यांच्यात ट्विटर युद्ध रंगलं. संजय मांजरेकरांनी सानियाच्या एका ट्विटवर कमेंट केल्याने हा वाद सुरु झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया मागील १८ महिन्यांपासून विजयी होत आहे. त्यामुळे ती मागील १८ महिन्यांपासून पहिल्या स्थानावर कायम आहे. सानियाने जेव्हा याबाबत ट्विट केलं तेव्हा त्या ट्विटबाबत एक चूक सुधारत संजय मांजरेकर यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.


सानियाने ट्विट केलं की, 'आज मी ८० आठवड्यांपासून जगात पहिल्या स्थानावर कायम आहे. हा एक शानदार प्रवास होता आणि यापासून मला अजून मेहनत करण्याची प्रेरणा मिळत आहे.


मांजरेकरांनी यावर एक ट्विट केलं. 'तुमच्या म्हणण्याचा अर्थ नंबर वन डबल्स प्लेयर. अभिनंदन!. 


मांजरेकरांनी हे ट्विट अशा अर्थाने केलं की सानिया ही पहिल्या स्थानावर डबल्स फॉरमॅटमध्ये आहे. पण सानिया हे खटकलं आणि तिने यावर प्रतिक्रिया देत ट्विट केलं की, 'हे सगळ्यांना माहित आहे की, मी आता सिंगल्स नाही खेळत.'


सानिया अनेक दिवसांपासून फक्त डबल्समध्ये खेळते आहे. ग्रँड स्लॅम इवेंट्समध्ये ही ती डबल्स आणि मिक्स डबल्समध्ये खेळली. तिने पुढे म्हटलं की, 'ही तर कॉमन सेंसची गोष्ट आहे की ती डबल्स रँकिंगबाबत बोलते आहे. मांजरेकर आणि त्यांच्या चाहत्यांना ही गोष्ट वाईट वाटू शकते. कदाचित हे कॉमन सेन्स इतकं कॉमन नाही आहे.'