मुंबई : आयपीएलच्या नवव्या हंगामात पदार्पण करणाऱ्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सची सुरुवात तितकीशी चांगली राहिली नाही. सततच्या पराभवाने झुंजत असलेल्या पुण्याच्या टीमने गुरुवारी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सात विकेटनी विजय मिळवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारच्या सामन्यात पुण्याच्या संघात उस्मान ख्वाजाने पदार्पण केले. या सामन्यात ख्वाजाने रहाणेसोबत पहिल्या विकेटसाठी ५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 


मात्र सामन्याआधीच ख्वाजाने सोशल मीडियावर आपल्या संघाच्या जर्सीसोबत एक ट्विट केले. Looks like Pune were expecting 'Khwaja' to come play. I better go home. असं त्याने म्हटलंय.


ख्वाजाच्या या ट्विटरनंतर सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने ट्विट करुन 'आयपीएलमध्ये तुझे स्वागत आहे मित्रा आणि १०० नावाच्या जर्सीवरुन चिंता? खरंतर ख्वाजा हे नावच खूप कूल आहे'. असं म्हटलंय.