पुणे: आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेल्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा हा सिजन म्हणावा तसा चांगला गेला नाही. आत्तापर्यंत खेळलेल्या 6 पैकी फक्त 2 मॅच पुण्याला जिंकता आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याचे दोन महत्त्वाचे खेळाडू केव्हिन पिटरसन आणि फॅप डुप्लेसिस जखमी झाल्यामुळे आयपीएलमधून आऊट झाले आहेत. आता केव्हिन पिटरसनऐवजी ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा पुण्याकडून खेळणार आहे. 


भारतात नुकत्याच झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये ख्वाजानं चांगली कामगिरी केली होती. तसंच ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश टी 20 लीगमध्येही सिडनीला जिंकवण्यात ख्वाजानं महत्त्वाचं योगदान बजावलं होतं. त्यामुळे आता ख्वाजा पुण्याचं नशीब बदलतो का हे पाहावं लागेल.