बंगळुरू :  भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या टेस्टमध्ये अचानक स्पायडर कॅमेरा बंद पडला. या गोंधळामुळे काही काळ मॅच थांबविण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलिया फलंदाजीसाठी आली तेव्हा चौथ्या षटकात स्पायडर कॅम बंद पडला. तो अशा ठिकाणी बंद पडला त्यामुळे खेळ पुन्हा सुरू करणे अशक्य होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा फलंदाज रेनशॉ आणि भारतीय कर्णधार हा स्पायडर कॅम हलविण्यासाठी त्याच्या खाली गेले. 


रेनशॉ याने आपल्या बॅटने हा कॅमेरा हलविण्याचा प्रयत्न केला. पण तो काही हलेना किंवा डुलेना.... कोहलीने त्याकडे हातवारे करून चल पळ असा इशारा केला. पण काहीच झाले नाही. 


मग काही वेळाने कॅमेरा हलू लागला आणि प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.