मुंबई : बंगळुरुमधील तरुणी विनयभंगाच्या घटनेवर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. याच घटनेवर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनेही या घटनेचा निषेध केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना घडली त्यावेळी तिथल्या बघ्यांना कोहलीनं खडे बोल सुनावलेत.. घरातल्या महिलेबाबत अशी घटना घडली असती तर असेच गप्प बसला असता का? अशा व्यक्तींना पुरुष म्हणायचे का असे सवाल विराटनं उपस्थित केलेत.



हा देश सुरक्षित आणि सगळ्यांसाठी समान असायला हवा, मग महिलांना दुय्यम स्थान का असंही विराटनं म्हटलंय. असे घृणास्पद प्रकार रोखण्यासाठी आपण सारे एकत्र येऊया असं आवाहन कोहलीने देशवासियांना केलंय. 


गुरुवारी बॉलीवुडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने या घटनेवर आपला संताप व्यक्त केला होता.