मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांच्या मृत्यूनंतर माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळी ट्विटरवर ट्रोल झालेला पाहायला मिळाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचं झालं असं की, विनोद खन्ना यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर त्यांच्या एका चाहत्यानं ट्विटरवर त्यांना आदरांजली वाहिली. परंतु, या ट्विटमध्ये त्यानं विनोद खन्ना यांच्याऐवजी विनोद कांबळीला टॅग केलं. 


त्यानंतर लगेचच ट्रोलिंग सुरू झालं. अनेक फॅन्सनं त्या चाहत्याच्या हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला की विनोद कांबली नाही तर विनोद खन्ना यांचं निधन जालंय. त्यानंतर त्या चाहत्यानं हे ट्विट माफी मागत डिलीटही करून टाकलं. 


परंतु, शांत बसेल तो कांबळी कसला... विनोद कांबळी एव्हढा भडकला की त्यानं ट्विटरवर तेव्हाच आपला राग व्यक्त केला... 'त्या लोकांना लाज वाटायला पाहिजे' असं म्हणत आपल्याला जिवंतपणीच मारणाऱ्याबद्दल त्यानं आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर त्यानंही विनोद खन्ना यांना ट्विटरवरूनच आदरांजली वाहिली. 

विनोद खन्ना यांचं नुकतंच दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते.