लंडन : भारताचा टेस्ट क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा अॅथलीट मीडिया कंपनी ‘अनस्क्रिप्टेड’सोबत जोडले गेलेले पहिले भारतीय ठरले आहेत. ही कंपनी खेळाडूंच्या जीवनावर आधारीत एक व्हिडिओ तयार करते आणि त्याला प्रसारीत करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट आणि रोहित हे दोघेही आता रियाल मॅड्रिडच्या क्रिस्टियानो रोनाल्डो आणि एफसी बार्सीलोनाच्या मेस्सी सारख्या जगातील नामवंत खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. रोनाल्डोचा पहिला अनस्क्रिप्टेड व्हिडिओ जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये त्याच्या घराचं वास्तव दाखवण्यात आलं होतं. एका आठवड्यातच हा व्हिडिओ ३ कोटी लोकांनी पाहिला होता.


या व्हिडिओमध्ये कोहलीने कोचकडून मिळालेला सर्वात चांगला सल्ला शेअर केला आहे. तर रोहित शर्माने त्याचा आदर्श सचिन तेंडुलकरबद्दल त्याचं मत सांगितलं आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ९ लाख लोकांनी पाहिला आहे.


पाहा व्हिडिओ