मुंबई : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांच्या रिलेशनशीपची अधिकृत घोषणा युवराज सिंगच्या लग्नात करणार असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिली आहे. 2 नोव्हेंबरला युवराज सिंगच्या लग्नात विराट आणि अनुष्का दोघंही उपस्थित राहणार असल्याचंही वृत्तपत्रानं म्हंटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अनुष्का शर्मा राजकोटमध्ये पोहोचली होती. मोहालीमध्ये सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मॅच आधीही विराट अनुष्का एकत्र दिसले होते.


29 नोव्हेंबरला चंदीगडच्या ललीत हॉटेलमध्ये युवराज आणि हेजलचा मेहंदीचा कार्यक्रम आहे तर 30 तारखेला भारत आणि इंग्लंडच्या टीमसाठी विशेष पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 नोव्हेंबरला युवराज आणि हेजल हिंदू संस्कृतीप्रमाणे लग्न करणार आहेत. गोव्यामध्ये हे लग्न होणार आहे. पाच डिसेंबरला युवराज-हेजलची संगीत पार्टी होणार आहे, तर सात डिसेंबरला दिल्लीच्या आयटीसी मौर्यामध्ये होणाऱ्या रिसेप्शनला क्रिकेट आणि बॉलीवूडमधले दिग्गद हजेरी लावणार आहेत.