विराट-अनुष्कामध्ये पॅच अप ?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचं वारंवार बोललं गेलं.
मुंबई: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याचं वारंवार बोललं गेलं. पण याबाबत विराट आणि अनुष्कानं कोणतंही स्पष्टीकरण दिलं नव्हतं. पण या दोघांमध्ये पॅच अप झाल्याचं बोललं जात आहे. आपल्या करियरवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी या दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता अशाही चर्चा आहेत.
पण गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे हे दोघं पुन्हा एकदा एकत्र यायची शक्यता आहे. या चार फोटोंमुळे विराट आणि अनुष्का हे पॅच अप व्हायच्या मार्गावर आहेत, हे म्हणायला वाव आहे.
विराट-अनुष्काचा डिनर
या दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याचं बोललं जात असतानाच विराट आणि अनुष्का मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये एकत्र डिनरला गेले होते. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
विराटच्या टी शर्टवरील तो मेसेज
विराट-अनुष्काच्या ब्रेक अपच्या बातम्या येत असतानाच कोहलीनं हार्टब्रोकन अशी पोस्ट केली होती. त्यामुळे या दोघांच्या ब्रेक अपबाबत आणखी चर्चा झाली. पण काहीच दिवसांपूर्वी कोहलीच्या टी शर्टवर असलेल्या मेसेजमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वी वेअर ऑन अ ब्रेक असा संदेश कोहलीच्या टी शर्टवर होता.
अनुष्काच्या वाढदिवसाला विराटचं सोशल गिफ्ट
१ मे रोजी अनुष्कानं आपल्या वयाची २८ वा वाढदिवस साजरा केला.... या दिवशीच विराटनं अनुष्काला पुन्हा एकदा इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करणं सुरू केलंय.