विराटने तोडला सुनील गावस्करांचा रेकॉर्ड
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ज्याप्रमाणे धावांचा पाऊस पाहायला मिळाला. त्यासोबतच या सामन्यात अनेक विक्रमांचीही नोंद झाली.
हैदराबाद : बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ज्याप्रमाणे धावांचा पाऊस पाहायला मिळाला. त्यासोबतच या सामन्यात अनेक विक्रमांचीही नोंद झाली.
भारताने या सामन्यात बांगलादेशवर २०८ धावांनी जबरदस्त विजय मिळवला. विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तब्बल १९ कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधलीये.
याआधी हा रेकॉर्ड भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या नावे होता. गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १८ सामन्यांमध्ये अपराजित राहण्याची किमया साधली होती. गावस्करांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९७७ ते १९७९च्या दरम्यान हा रेकॉर्ड केला होता.
विराटच्या नेतृत्वाखाली अपराजित राहण्याची ही परंपरा २० ऑगस्ट २०१५मध्ये कोलंबो टेस्टपासून सुरु झालीये. यानंतर आता भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात कसोटी सामने रंगणार आहेत.