मुंबई : ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या माईंड गेममध्ये पुर्णपणे फसून विराट हताश झाला आहे, असं वक्तव्य जलद गोलंदाज मिचेल जॉन्सनने केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेमध्ये साजेशी खेळी करता न आल्याने विराटवर टीका करणारे पुन्हा जागे झाले आहेत. 


जॉन्सनने एका ब्लॉगमध्ये असं लिहलंय की, 'धावा निघत नसल्याने नक्कीच विराट निराश आहे आणि त्याचं नैराश्यामुळे तो दाबला जातोय.'


तो पुढे म्हणाला, 'दुसऱ्या सामन्यात त्याच्या स्वभावात अचानक बदल झाला आणि सामना त्यांच्या बाजूने वळला. पडणाऱ्या प्रत्येक विकेटनंतर त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी असायची.'


'तसंच विराट नेहमी सगळ्यांचा केंद्रबिंदु असतो. त्या सामन्यात तो प्रेक्षकांमध्ये उत्साह आणत होता. दरम्यान आमच्या खेळाडूंना धीर देत होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो स्वत: उत्साही होता. त्याच्या या वागण्याने मला गेलेले दिवस आठवले. कारण माझ्या कारकिर्दीत आम्ही बऱ्याचदा भिडलो होतो.'