इंदूर : न्यूजीलंडला 3-0 ने धूळ चारत भारताने आज विजय साजरा केला. अश्विन पाठोपाठ विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमध्ये एक नवा रेकॉर्ड बनवला आहे.


विराटने बनवले हे रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. सामना विजयासोबतच विराटने कर्णधार म्हणून सर्वात जास्त टेस्ट मॅच जिंकण्याचा भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर आणि नवाब पटौदी यांना मागे टाकलं आहे.


2. या विजयासोबत सर्वात यशस्वी कर्णाधारांच्या यादीत विराट चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. या यादीच महेंद्र सिंग धोनी पहिल्या स्थानावर आहे.


3. विराटने आत्तापर्यंत 17 टेस्ट मॅचमध्ये कर्णधारपद भूषवलं असून 10 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर 2 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे.


इतर रेकॉर्ड


1. दुहेरी शतक झळकवणारा विराट कोहली हा पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. जुलै, 2016 मध्ये त्याने वेस्ट इंडिज विरोधात पहिली डबल सेंच्यूरी ठोकली होती.


2. दुसऱ्यांदा भारतासाठी चौथ्या आणि पाचव्या स्थानावरील बॅट्समनने 150 हून अधिक स्कोर केला आहे. याआधी 2003-04 मध्ये सचिन तेंडुलकरने 241* आणि लक्ष्मणने 178 रन केले होते.


3. विराट कर्णधार म्हणून एका वर्षात दोन वेळा 150 हून अधिक स्कोर करणारा चौथा कर्णधार बनला आहे. याआधी विजय हजारे, सुनील गावस्कर आणि अजहरुद्दीन यांनी देखील हा रेकॉर्ड केला आहे.


4. अजिंक्य रहाणेने मागील 9 हाफ सेंच्यूरींना सेंच्युरींमध्ये बदललं आहे. 


5. कर्णधार विराट कोहलीने भारतात पहिली टेस्ट सेन्चुरी ठोकली आहे.