मुंबई : आईपीएल ९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमकडून ओपनिंग करणाऱ्या जगातला सर्वात धडाकेबाज फलंदाज क्रिस गेल आउट ऑफ फॉर्म आहे. गेलने आतापर्यंत कोणतीही मोठी खेळी केली नाही. त्यामुळे त्याच्या खेळावरुन सध्या चर्चा सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीने याबाबत एक वक्तव्य केलं आहे. कोहली म्हणतो की, मी गेलच्या फार्ममुळे बिल्कुल चिंतेत नाही. गेल मोठी इंनिगपासून फक्त एक इंनिग दूर आहे.'


कोहली म्हणतो की, 'गेलवर त्याला विश्वास आहे. तो चांगला खेळ नक्की दाखवेल. जेव्हा आम्हाला गरज असेल तेव्हा तो आमच्यासाठी नक्की शतक मारेल. दुसरे खेळाडूही चांगले खेळत आहेत. गेलने टी-२० करिअरमध्ये १७ शतक लगावले आहे. जे सोपं नाही.' पहिल्या २ मॅचमध्ये त्याने १ आणि ० रन केले आहे.