मुंबई : 'मला सिक्स मारता येत नाही म्हणून मी चौकारावर समाधान मानतो, मी जास्तीत जास्त धावा चौकारावर काढत असतो. माझ्याजवळ मोठे षटकार मारण्याची कला नाही त्यामुळेच मी चौकार लगावण्यावर जास्त लक्ष देतो. असे वक्तव्य भारताचा विस्फोटक बॅट्समन विराट कोहलीने केले आहे.


विराट कोहलीने आतापर्यंत २२ टी-२० सामन्यात फक्त २७ षटकार तर १२७ चौकार  लगावले आहेत. उद्यापासून आशिया चषकाला सुरुवात होत आहे. भारताचा पहिला सामना हा यजमान बांग्लादेश सोबत होणार आहे. 
 
आशिया चषकाला सुरुवात होण्याच्या आधी पत्रकांराशी  बोलत असतांना त्याने हे वक्तव्य केलं आहे. विराट म्हणतो की, भारतीय संघात समतोल आहे. संघातील प्रत्येक खेळाडूकडे आत्मविश्वास आहे.'