मुंबई : भारताचा धडाकेबाज क्रिकेटर विराट कोहली ही सध्या जगातील अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करतोय. त्याच्यामध्ये असलेली क्षमता ही अख्या जगाने पाहिली आहे. भारतासाठी अनेकवेळा संकटमोचक ठरलेला विराट त्याच्या खेळामुळे अधिक जाणला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटची खेळण्याची स्टाईल आणि ट्रिक हि पाकिस्तानच्या क्रिकेटरर्सने ही शिकावी. यासाठी शोएब अख्तर याने विराटकडे विचारणाही केली. शोएबने अहमद शेजाद आणि इतर खेळाडूंना विराट कोहलीकडून क्रिकटचे धडे घेण्याचं सांगितलं. एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या इंटरव्ह्युमध्ये देखील शोएबने याचा खुलासा केला आहे.


विराटने ही यावर प्रतिक्रिया दिली आहे. शोएब अख्तरने विराटला त्याच्या ट्रिक्स आणि खेळण्याच्या आयडिया पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत शेअर करण्यास सांगितलं पण विराटने यावर त्याला जे उत्तर दिलं त्यामुळे शोएबला तोंडावर पडण्याची वेळ आली. 


विराट म्हणतो की, 'जेव्हा ही पाकिस्तानचे खेळाडू भेटतात तेव्हा ते क्रिकेट सोडून इतर विषयांवरच चर्चा करत असतात.'