नवी दिल्ली : आयपीएलच्या १० व्या सीजनमध्ये सुरवातीच्या काही सामन्यांमध्ये विराट कोहलीची खेळण्याची शक्यता कमी आहे. कारण विराट कोहली सध्या दुखापतीमुळे आराम करतोय. क्रिकेट क्षेत्रात विराट आज सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. पण आता तो जाहिरातींच्या क्षेत्रातही अव्वल ठरतोय. या क्षेत्रात त्याचं महत्त्व सतत वाढतांना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीची एका दिवसाची फी, आता ५ कोटी रुपये आहे. हा कोणत्याही सेलिब्रेटी द्वारे एका दिवसासाठी घेतली जाणारी सर्वाधिक फी आहे. यासोबतच तो जगातील सर्वोच्च स्टार्सच्या यादीत आहे. 


मागच्या वर्षापर्यंत विराट कोहलीची फी जवळपास आतापेक्षा अर्धी होती. एक दिवसासाठी तो 2.5 ते 3 कोटी रुपये फी घेत होता. एप्रिल महिन्यापासून त्याची फी आणखी वाढणार असल्याचं बोललं जातंय. कोहली लवकरच पेप्सिकोसोबत डील करणार असल्याचं बोललं जातंय.


भारतात कोणत्याही सेलिब्रिटी कडून घेतली जाणारी ही सर्वाधिक फी आहे. एक दिवसासाठी ५ कोटी फी घेत कोहलीने धोनी, रणबीर सिंह आणि रणबीर कपूरला ही मागे टाकलं आहे. पेप्सीको सोबत आता विराट करार करणार आहे.