दुबई : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीला आयसीसीने जाहीर केलेल्या 2016च्या वनडे टीममध्ये कर्णधार म्हणून निवडण्यात आले असले तरी टेस्ट टीममध्ये त्याला स्थान मिळू शकलेले नाहीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये भारताचा केवळ एका क्रिकेटपटूचा समावेश आहे. भारताचा अव्वल स्पिनर आर. अश्विनने टेस्ट टीममध्ये स्थान मिळवलेय. या टीमचा कर्णधार इंग्लंडचा अॅलेस्टर कूक आहे. 


टेस्ट टीमसाठी निवड कऱण्यासाठी 14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 यादरम्यानच्या कामगिरीचे मोजमाप करण्यात आले होते. या कालावधीत भारताच्या टेस्ट टीमची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या कोहलीने 8 टेस्ट मॅचमध्ये केवळ 451 धावा केल्या होत्या. यात एका शतकाचा समावेश आहे. त्यामुळेच विराटचा टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. 


भारताच्या वनडे आणि टी-20चा उपकर्णधार विराट कोहलीला आयसीसीच्या वनडे टीमचा कर्णधार म्हणून निवडण्यात आलेय. या टीममध्ये दक्षिण आफ्रिकेचे 4 आणि ऑस्ट्रेलियाचे 3 क्रिकेटर्स आहेत.