राजकोट : भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचा २८वा बर्थडे रविवारी साजरा झाला. या खास क्षणी विराटची गर्लफ्रेंड आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याच्यासोबत होती. दोघांनी मिळून एकत्र बर्थडे सेलिब्रेशन केले. अनुष्कासोबत साजरा केलेला हा बर्थडे विराट कधीही विसरु शकणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकोटमध्ये भारताची इंग्लंडविरुद्ध कसोटी सुरु होणार आहे. त्यामुळे राजकोटमध्येच विराटचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला. 


अनुष्का सोबत असल्याने विराटसाठी हा बर्थडे खूपच स्पेशल होता. राजकोटमधील इम्पेरियल हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला. िराटसाठी स्पेशल केक तयार करण्यात आला होता. जो जर्सीच्या आकाराचा होता. विराट नेहमी १८ नंबरची जर्सी घालतो.