दुबई : ऑस्ट्रेलियाला मालिकेत २-१ अशी धूळ चारल्यानंतर आयसीसी रँकिंगमध्ये भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले असले तरी कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची मात्र घसरण झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या पुजाराची चौथ्या स्थानी घसरण झालीये तर विराट कोहली पाचव्या स्थानी घसरलाय. या यादीत स्टीव्हन स्मिथ पहिल्या स्थानी कायम आहे. 


अखेरच्या कसोटीत स्टीव्हन स्मिथने शानदार शतक झळकावले होते. ज्यो रुट या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. 


दुसरीकडे गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा अव्वल स्थानी आहे तर आर. अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी अनुक्रमे रंगना हेरथ, जोश हेझलवूड आणि जेम्स अँडरसन आहेत.