मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एका कारचा समावेश झालाय. या कारचे नाव आहे ऑडी क्यू ७.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने फेसबुकवर ऑडी क्यू ७ सोबतचा फोटो शेअर केलाय. या फोटोत त्याने आपली कार अपग्रेड करण्याबाबत ऑडी कंपनीचे आभार मानलेत. 


ऑडी इंडियाचे प्रमुख राहिल अन्सारी यांनी विराटला या गाडीची चावी सोपवली. या कारची किंमत तब्बल ७२ लाख रुपये आहे. विराटच्या पर्सनल कार कलेक्शनमध्ये ऑडीच्या अनेक कार आहेत. त्याच्याकडे ७ लग्झरी कार आहेत यात पाच ऑडी आहेत.