कोलकाता : भारत आणि पाकिस्तान या दोन संघात क्रिकेट घमासान आज काही तासात पाहायला मिळणार आहे. मात्र, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा बॉलरला दिलेले वचन सामन्याच्या आधी पुरे केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने पाक बॉलर मोहम्मद आमिरला एक बॅट खास भेट म्हणून दिली आहे. विराटने आशिया कपच्यावेळी आमिरला भेट देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार आज सकाळी सराव करताना पाकिस्तानचा कर्णधार शहीद आफ्रिदी आणि मोहम्मद आमिर विराटला भेटायला मैदानावर आले होते. त्यावेळी दोघांनी हस्तांदोलन केले. त्यानंतर विराटने एक बॅट देऊन आपले वचन पुरे केले.


ईडन गार्डन्स स्टेडिअमवर कोहली बॅटिंगचा सराव करीत होता. त्यावेळी विराटने आमिरला खास भेट दिली. आमिरने खुशीत बॅट स्विकारली. त्यानंतर आफ्रिदी, कोहली आणि मिर हास्यविनोद करत होते. त्यानंतर त्यांनी निरोप घेऊन मैदानातून केले.