बंगळुरू : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं ७५ रननं विजय मिळवत सीरिजमध्येही कमबॅक केलं आहे. अश्विनच्या फिरकीपुढे कांगारूंनी चौथ्याच दिवशी लोटांगण घातलं. पराभव समोर दिसत असताना ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमेश यादवच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव स्मिथला अंपायरनं एलबीडब्ल्यू आऊट दिलं. पण अंपायरचा हा निर्णयाचा रिव्ह्यू घ्यायचा का नाही हे विचारण्यासाठी स्मिथनं ड्रेसिंग रूमकडे इशारा केला.


आयसीसीच्या नियमांनुसार रिव्ह्यू घेताना ड्रेसिंग रुमचा सल्ला घेता येत नाही. स्मिथची ही चिटिंग बघितल्यानंतर पाहून विराट कोहली मात्र चांगलाच भडकला. अंपायरनीही यानंतर स्मिथला सुनावलं. या प्रकारामुळे आता आयसीसी आणि मॅच रेफ्री स्मिथवर काय कारवाई करतात हे पाहाणं महत्त्वाचं आहे.


पाहा नेमकं काय झालं मैदानात