पुणे :  पहिल्या सामन्यात शानदार फलंदाजी करून सामनावीराचा किताब पटकविणाऱ्या केदार जाधव याचे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. त्याची ही काही चांगल्या खेळीपैकी एक खेळी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहली म्हणाला हा माझ्यासाठी खूप खास क्षण होता.  टीममध्ये असा एक खेळाडू पाहिजे, की त्याला विश्वास पाहिजे की कोणत्याही परिस्थिती आपण जिंकणार आहे. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला. 


केदार जाधवने खूप चांगली खेळी केली. इंग्लडकडे चार तेज गोलंदाज होते, तरी त्याने खूप चांगली फलंदाजी केली. जाधवने स्पिन गोलंदाजाविरूद्ध आक्रमक फलंदाजी केली. कोणत्याही स्पिनरला संधी दिली नाही. 


भारताचे १२ ओव्हरमध्ये ४ विकेटच्या मोबदल्यात ६३ धावा झाल्या होत्या. पण त्याचा दबाव न घेता केदाराने आक्रमक शॉर्ट खेळले. जाधवने अशाप्रकारे शॉट खेळले की त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. तो असा खेळू शकतो यावरही विश्वास बसत नव्हता.