बंगळुरु: आयपीएलच्या नवव्या सिझनची फायनल रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणार आहे. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ही मेगा फायनल रंगणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फायनल आधी आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीनं हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरचं कौतुक केलं आहे. क्रिकेटविषयीचे माझे आणि वॉर्नरचे विचार जुळतात, कोणतीही नवीन गोष्ट करण्याआधी आम्ही दोघं स्वत:वर त्याचा प्रयोग करतो आणि मग टीममधल्या खेळाडूंना तसं करायला सांगतो, असं कोहली म्हणाला आहे. 


फायनलमध्ये हैदराबादला हरवणं हे मोठं कठीण आव्हान आहे. ही मॅच रोमांचक होईल यात काही शंका नाही, असं वक्तव्य कोहलीनं केलं आहे. फायनलसाठी दोन दिवसांची विश्रांती मिळाल्यामुळे रणनिती बनवण्याची संधी मिळाली अशी प्रतिक्रिया कोहलीनं दिली आहे.