पुण्याविरुद्धचा सामना रोमांचक झाला - कोहली
कर्णधार विराट कोहली आणि एबीडे विलियर्स यांच्यातील शतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने रायजिंग पुणे सुपरजायंटला त्यांच्याच मैदानात हरवले. पुण्याचा १३ धावांनी पराभव करत बंगळुरु पुन्हा विजयाच्या मार्गावर परतलीये.
पुणे : कर्णधार विराट कोहली आणि एबीडे विलियर्स यांच्यातील शतकी भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने रायजिंग पुणे सुपरजायंटला त्यांच्याच मैदानात हरवले. पुण्याचा १३ धावांनी पराभव करत बंगळुरु पुन्हा विजयाच्या मार्गावर परतलीये.
धोनीच्या संघावर विजय मिळवल्यानंतर सामना रोमांचक झाला. आमच्या खेळाडूंनी चांगला खेळ केला, असे विराटने सांगितले.
टॉस हरण्याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला, मी दरवेळी टॉस हरतो मात्र पुढच्या वेळी टॉस जिंकण्याचा प्रयत्न नक्की करेन.