नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिकेटर विराट कोहली सार्वजनिक जीवनात अशा व्यक्ती आहेत की त्यांची सर्वाधिक लोकप्रियता आहे. हे दोघे एकमेकांबद्दल आपले विचार काय व्यक्त करतात, याची अनेकांना उत्सुकता असते.


विराट शुभेच्छा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी आणि कोहली नेहमी एकमेकांचे प्रशंसा करतात. मोदींनी सरकार स्थापन करताना विराटने खास शुभेच्छा दिल्या होत्या. तर विराट कोहलीने शतक केल्यानंतर मोदींनी ट्विट करत कसोटी कर्णधाराचे कौतुक केले होते.


पहिला शब्द आला डोक्यात


व्यक्तीगत पातळीवर दोघांची मुलाखत किंवा चर्चा झाल्याची पाहण्यात नाही. मात्र, सीएनएनवर मल्लिका कपूर हिने विराटची मुलाखत घेतली, त्यावेळी पंतप्रधान मोदींबाबत एका शब्दात तू का बोलशील असे विचारले. त्यावेळी उत्तर होते 'आत्मविश्वास'. विराटने सांगितले पंतप्रधान मोदीबद्दल माझ्या डोक्यात पहिला शब्द आला तो होता 'आत्मविश्वास'.