खराब कामगिरीचा कॅप्टन विराट कोहलीला फटका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरीजमधील खराब कामगिरीचा फटका टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला बसला आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरीजमधील खराब कामगिरीचा फटका टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला बसला आहे.
या सीरीजमधल्या दोन्ही मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या विराट कोहलीची आयसीसीच्या रँकिंगमध्ये चौथ्या क्रमांकावर घसरण झालीय.
या सीरीजमधील दोन्ही मॅचमध्ये 0, 13, 12 आणि 15 रन्स अशी विराटची निराशाजनक कामगिरी राहिलीय. त्यामुळे कोहली 847 गुणांवर पोहचलाय.
कोहलीची घसरण झाली असली तरी आर. अश्विननं मात्र या रँकिंगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरीजमध्ये केलेल्या जबरदस्त फॉर्मच्या जोरावर अश्विननं आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. ऑलराऊंडर आणि बॉलर्सच्या यादीत अश्विननं अव्वल स्थान पटकावलं आहे.