मोहाली : भारत आणि पाकिस्तान सामन्यात अमिताभ बच्चन यांनी राष्ट्रगीत चुकीचं गायलं होतं, अशी तक्रार पी उल्हास या सामाजिक कार्यकर्त्याने दिली होती. हे प्रकरण शांत होत नाही, त्या आधी पी उल्हास यांनी भारतीय खेळाडूंची तक्रार मोहाली पोलीस स्टेशनला केली आहे.


पी उल्हास यांची तक्रार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पी उल्हास म्हणतात, टीम इंडियाचे खेळाडू भारतीय झेंड्याचा वापर योग्य पद्धतीने करताना दिसत नाहीत, ज्या पद्धतीने भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवर तिरंगा वापरण्यात येतोय, ती थोडीशीही चांगली गोष्ट नाहीय.


मैदानात हेल्मेट ठेवतात म्हणून


पी उल्हास आपल्या तक्रारीत म्हणतात, टीम इंडियाचे खेळाडू सामन्या दरम्यान आपलं हेल्मेट मैदानात उतरवून ठेवतात, असं करणं हा तिरंग्याचा अपमान आहे. सामन्या दरम्यान काही खेळाडू मैदानात थुंकत असतात, आणि तिथेच हेल्मेट ठेवणे हा मोठा अपमान आहे.


कोहली लावतो आपल्या हेल्मेटला तिरंगा


विराट कोहली जे हेल्मेट लावून खेळतो, त्या हेल्मेटला तिरंगा आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध असलेल्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळाल्यानंतर, विराट कोहली मैदानात खाली बसला होता, तेव्हा त्याने हेल्मेट खाली ठेवलं होतं, पी उल्हास यांनी हे देखील उदाहरण दिलं आहे, खेळाडूंनी हेल्मेटला तिरंगा लावू नये असं आवाहन, पी उल्हास यांनी सरकारला केली आहे.


धोनीने यापूर्वीच हटवला आहे तिरंगा


यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, विराट कोहली सह काही खेळाडू आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावतात, टीम इंडियाचा कॅप्टन धोनी मात्र हेल्मेटवर तिरंगा लावताना दिसत नाही.